देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना लि. - इचलकरंजी.

        कोल्हापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते हातकणंगले , शिरोळ, कागल तालुक्याचे हरीत क्रांतीचे जनक देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी कारखाना कार्यक्षेत्रात उपसा सिंचन योजनांचे जाळे निर्माण करुन संपूर्ण ग्रामिण भागाच्या जमिनी ओलिताखाली आणून कार्यक्षेत्रातील बहुतांश गावे सुजलाम सुफलाम केली. कारखान्याचे सन्मानीय संचालक मंडळ व सभासदांनी या सर्व गोष्टींची जाणीव ठेवून कारखान्यास संस्थापक पद्मश्री देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे नांव दिले.

        देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी संपूर्ण जिल्ह्यातील कला, क्रिडा ,शैक्षणिक , औद्यागिक व सामाजिक क्षेत्रातील सर्वांगिण विकासासाठी नेहमी मदतीचा हात दिला व संपूर्ण परिसर स्वावलंबी बनविला. कोल्हापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते व पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कै. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले व्यक्तीमत्व म्हणजे श्री. पी.एम.पाटील. म्हणून आण्णांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना वेळोवेळी कारखान्याच्या संचालकपदी तसेच इतर सहकारी संस्थातून संधी दिली.

        श्री. पी.एम.पाटील यांचे व्यक्तीमत्व म्हणजे कबनूर गांवचे 5 वर्षे सरपंचपद, जिल्हा परिषदेचे 12 वर्षे सदस्य, पंचगंगा साखर कारखान्याचे सहा वर्षे उपाध्यक्षपद, डिस्टीलरी कमिटीचे 6 वर्षे चेअरमनपद व कारखान्याचे सलग 10 वर्षे चेअरमनपद अशी आजतागायत सहकार क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आहे . आण्णांच्या निधनानंतर सभासदांनी तोच विश्वास दाखवून पी. एम.पाटील यांच्या हाती कारखान्याची सूत्रे दिली तेव्हा कारखाना अनेक संकटातून मार्गक्रमण करीत होता. अशावेळी कारखान्याबद्दल पुन्हा विश्वासाहर्ता निर्माण करणे हे एक मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. सभासदांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केला.

        कारखान्याला आर्थिक आरिष्टातून बाहेर काढायचे तर काहीतरी नवीन निर्णय घेणे आवश्यक होते. मळलेली वाट सोडून नवीन वाट शोधावी लागणार होती. यासाठी त्यांनी 2008 मघ्ये सुरूवातीला कारखानास्थळी बांधा - वापरा व हस्तांतरीत करा, या तत्वावरील सहवीज प्रकल्प साकारण्याचा धाडसी निर्णय श्री. पी.एम.पाटील यांनी घेतला. त्यामुळे 30 मेगॉवॅटची वीजेची निर्मिती सुरु झाली. त्यानंतर कारखान्याची आर्थिक परिस्थिती सुधारत गेली. तथापि साखर धंद्यातील अस्थिरता, साखरेचे उतरलेले दर तसेच वाढता उत्पादन खर्च यामुळे कारखान्यावर असलेले बँकेचे कर्जाचे हप्ते वेळेत परत करावे लागल्याने एकीकडे बँकेचे कर्ज वाढत गेले. आणि कारखान्यावर पुन्हा एकदा आर्थिक संकट निर्माण झाले. त्यामुळे सर्व देणी भागवून कारखाना सुस्थितीत करणे अशक्यप्राय बनत गेले. स्व. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी उभारलेले स्मारक चिरंतन राहावे व त्याचे नांव पुसले जावू नये त्याचप्रमाणे सभासद व कामगारांची देणी बुडू नयेत व त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून श्री. पी.एम पाटील व त्यांच्या सहकारी संचालकापुढे कारखाना भाडे तत्वावरती चालवण्यास देण्याशिवाय पर्याय उरला नव्हता त्यामुळे श्री. पी.एम.पाटील यांनी कारखाना 18 वर्षे दीर्घ मुदतीच्या कराराने भाडे तत्वावर देण्याचा धाडसी निर्णय घेतला. जर हा निर्णय घेतला नसता तर कदाचित कारखाना चालू झाला नसता व कारखान्यावरील कर्जापोटी लिलावाची वेळ आली असती.

        त्यामुळे श्री. पी.एम.पाटील यांनी अत्यंत धीरोदात्त्तपणे, संयमाने, विचारपूर्वक व दूरदुष्टी ठेवून सभासद व कामगारांच्या दृष्टीने भाडे तत्वावर देण्याचा घेतलेला निर्णय अचूक आणि योग्यच ठरला. कारखान्याने हा घेतलेला निर्णय सभासद , कामगार तसेच कारखान्यावर अवलंबून असणा-या सर्व लोकांच्या हिताचा असून त्यांनी कारखाना चालवायला देणेसंबंधी केलेला करार हा राज्याच्या सहकार क्षेत्रातील कारखानदारीला नवी दिशा व एक आदर्श निर्णय ठरला. कारखाना कार्यस्थळावर देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या समाधीस्थळाचे शुशोभीकरण करून, गेस्टहाऊसचे नुतनीकरण केले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कबनूर गावच्या चौकामध्ये कै. देशभक्त रत्नाप्पाण्णांचा अर्धापुतळा आणि कारखाना स्थळावर भव्य असा पूर्णाकृती पुतळा उभारणीचे काम करणेत आले आहे. तसेच देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार या नावाने शैक्षणिक संस्था स्थापन करून कारखाना कार्यस्थळ, कबनूर व कोरोची परिसरातील सभासद व कामगार तसेच सर्वसामान्यांच्या मुलांसाठी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या दोन शाळा सुरु करून माफक फी मध्ये इयत्ता पहिली ते दहावीच्या शिक्षणाची सोय उपलब्ध करून त्यांनी दिली आहे.

        सर्व सभासदांच्या अमूल्य सहकार्यामुळेच आजच्या स्पर्धेच्या युगात या कारखान्याची धुरा ययशस्वीपणे गेली 15 वर्षे उत्तमरित्या मा.चेअरमन श्री. पिरगोंडा म्हादगोंडा पाटील तथा पी.एम.पाटील व त्यांचे सहकारी संचालक मंडळ उत्तमरित्या पार पाडत आहेत.