पंचगंगा सहकारी साखर कारखाना

स्वराज्याचे रुपांतर “सुराज्यामध्ये” करण्याने ख-या स्वातंत्र्याची प्रचीति येते. स्वराज्याचे सुराज्य करण्याच्या कार्यामध्ये, कर्तबगारीला फार मोठे स्थान आहे. भारतासारख्या कृषिप्रधान देशाची उन्नति, ही सामान्य शेतक-यांच्या आर्थिक उन्नतीवर अवलंबून आहे. समतेच्या पायावर सामान्य जनांची आर्थिक उन्नति करण्याच्या दिशेने वाटचाल करणा-या आपल्या लोकशाही सरकारने, सहकारी तत्वावर शेतक-यांच्या सामुदायिक मालकीचे साखर कारखाने काढण्याचे धोरण जाहीर केल्यामुळे कार्यक्षेत्रातील शेतकरी , कामगार व पर्यायाने ग्रामिण भागाचे कल्याणाकरीता कारखान्याची उभारणी कारखान्याचे संस्थापक चेअरमन दिवंगत मा.पद्मश्री देशभक्त रत्नाप्पाण्णा कु्ंभार यांनी कारखाना निर्माण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. त्यांनी अनंत यातना सोसून दिनांक 01/10/1955 साली श्री पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. कारखान्याच्या उभारणीस अनेक शेतकरी , सभासद , सहकारी संस्था, बँका आणि कारखाना संबंधित इतर घटकांनी अतिशय कष्ट घेवून कारखानाची जडण घडण करणेत मोलाचे सहकार्य केले आहे. ह्या पवित्र कर्मभूमीस अनेक साधू संत, विद्ववान, थोर मोठ्या मंडळींचा पदस्पर्श झाला आहे .
आज रोजी या कारखान्याचे ‘अ’ वर्ग ऊस उत्पादक सभासद 24,389, ‘ब’ वर्ग बिगर उत्पादक संस्था सभासद 122 व ‘ब’ वर्ग बिगर उत्पादक व्यक्ती सभासद 1303 इतके आहेत. कारखान्याचे अधिकृत भाग भांडवल रुपये 25.42 कोटी इतके आहे. कारखाना रजिस्टर झाला त्यावेळी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकूण 79 गावांचा समावेश होता पण दिनांक 31/03/2024 अखेर कर्नाटकसह महाराष्ट्रातील एकूण सहा तालुक्यातील 141 गांवे आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रांत आहेत.